आष्टी येथे अनाथ बालकांसोबत साजरा केला शिवसेना सचिव संजय मोरे यांचा वाढदिवस

आष्टी येथे अनाथ बालकांसोबत साजरा केला शिवसेना सचिव संजय मोरे यांचा वाढदिवस आष्टी (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९:…

एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परिचराच्या खिशात आढळल्या उत्तराच्या सत्यप्रती

एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परिचराच्या खिशात आढळल्या उत्तराच्या सत्यप्रती   जिल्हा परिषदेचे मुख्य कार…

अभियंत्यासह खासगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापडले जाळ्यात

अभियंत्यासह खासगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापडले जाळ्यात चंद्रपूर महानगरपालिका येथील घटना चंद्रपूर :- पूर्वी …

विद्यार्जणाचे कार्य करणाऱ्या शिक्षकाने केले ६ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे चंद्रपूर : विद्यार्जनाचे कार्य करणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील आठव्या वर्गातील एक नव्हे तर तब्बल सहा विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. शहरातील एका प्रतिष्ठित विद्यालयात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकावर पॉक्सोतंर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गोवर्धन गोंडाणे (५१) रा. इंदिरानगर, चंद्रपूर असे अटकेतील आरोपी शिक्षकाचे नाव आहे. चंद्रपुरातील एक नामवंत शाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनीशी गैरवर्तन करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या प्रकरणाची शाहनिशा करण्यासाठी एक महिला कर्मचाऱ्याला पाठवले. त्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. लगेच महिला व बालकल्याण विभागाला माहिती दिली. त्यांनी चाईल्डलाईनच्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठवले. त्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थिनीला विचारणा केली असता, एक नव्हे तर चक्क सहा विद्यार्थिनींनी शिक्षकाच्या वागणुकीच्या तक्रारी दिल्या. त्यानुसार शहर पोलिसांनी वर्गशिक्षक गोंडाणे याच्यावर पॉक्सो ८, १० व बीएनएस ७४, ७५ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पल्लवी काकडे, पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खंडाईत आदींनी केली.दोन दिवसांची पोलीस कोठडी शहर पोलिसांनी शुक्रवारी आरोपी शिक्षकाला अटक केली. दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायधिशांनी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिक्षक गोंडाने हा मागील अनेक वर्षांपासून त्या शाळेत कार्यरत होता. त्यामुळे आणखी काही पीडित विद्यार्थिनी समोर येण्याची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थेत पोलीस प्रशासन, चाईल्डलाइन व जिल्हा महिला व बाल विकास विभागातर्फे गुड टच बॅड टच बाबत जनजागृती करण्यात येते, अश्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक मुली स्वतःवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगतात, त्यामुळे प्रतिष्ठित चेहऱ्यामागील विकृत नराधमाचा खरा चेहरा पुढे येत आहे. अश्या घटना पुढे याव्या यासाठी बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर यांनी आवाहन केले कि भीतीपोटी आपल्यावर घडलेला प्रकार मनात दाबून ठेवू नका, आपली भीती कायम बाजूला करीत अन्यायाविरोधात आवाज उचला, त्यासाठी महिला, तरुणी व मुलींनी चाईल्डलाईन च्या १०९८ वर संपर्क साधा.

विद्यार्जणाचे कार्य करणाऱ्या शिक्षकाने केले ६ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे  चंद्रपूर : विद्यार्जनाचे कार्य  करणाऱ्या एका…

नागपूर येथे विदर्भ निर्माण जनसकंल्प लॉंग मार्च तथा मेळाव्याचे आयोजन

नागपूर येथे विदर्भ निर्माण जनसकंल्प लॉंग मार्च तथा मेळाव्याचे आयोजन  गडचिरोली:-  विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंग मार्च व म…

राज्याला मिळाणार 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 अतिरिक्त तहसीलदार कार्यालय

राज्याला मिळाणार 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 अतिरिक्त तहसीलदार कार्यालय मुंबई:- गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी, मालेवाड…

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आष्टी तर्फे शिवजयंती थाटामाटात साजरी

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आष्टी तर्फे शिवजयंती थाटामाटात साजरी आष्टी (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९):- सार्वज…

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !