अभियंत्यासह खासगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापडले जाळ्यात

0
अभियंत्यासह खासगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापडले जाळ्यात


चंद्रपूर महानगरपालिका येथील घटना






चंद्रपूर :- पूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सर्वात जास्त
खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांची नावे पुढे
यायची. मात्र, आता प्रथम श्रेणीपासून ते ज्यांची
कुठलीही श्रेणी नाही, असेही लाच लुचपत प्रतिबंधक
विभागाच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. अश्याच प्रकारे चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा स्थापत्य अभियंता व खाजगी इसमास १ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारतांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. शुभम नंदकिशोर वरघट वय ३० वर्षे, पदस्थापत्य अभियंता, पंतप्रधान आवास योजना, अतिरिक्त
कार्यभार अतिक्रमण विभाग, यांनी खाजगी इसम दिनेश
दिलीप समद्दर वय ३७ वर्षे यांचे मार्फतीने १ लाख ३० हजार रूपये लाच मागणी करून स्विकारल्याने ॲन्टी
करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने कार्यवाही केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चंद्रपूर
येथील रहिवासी असून तक्रारदाराचे भंगाराम वार्ड
चंद्रपूर येथे भंगाराचे (स्क्रब) दुकान आहे. त्यांनी रान
२०२० मध्ये ईराई नदीकाठावरील १२०० स्के, फुटाचे बांधकाम असलेले घर खरेदी केले होते. जे नंतर तोडून वॉल कंपाऊड आणी टिनावे शेड टाकून भंगारसाठविण्यासाठी वापरत होते. सदर जागेच्या मागील बाजुस असलेल्या प्लॉट धारकाने रस्त्यासाठी अडचण येत असल्याने महानगरपालीकेकडे तक्रार केली होती.

त्यावरून तक्रारदाराला महानगरपालीकेकडून नोटीस मिळाली होती. त्यासंबधाने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदाराने अभियंता शुभम वरघट व दिनेश समदर यांची भेट घेतली असता, वरघट यांनी बांधकाम अनाधिकृत असल्याचे सांगुन ते न तोडण्यासाठी ३ लाख रूपयांची लाच मागीतली होती. त्यांच्यात तडजोडी अंती २ लाख ३० हजार रूपये देण्याचे ठरले, त्यामुळे तक्रारदाराने घाबरून १७ फेब्रुवारी २०२६ रोजी १ लाख रूपये वरघट यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम दिनेश समदर यांचेकडे दिले. उर्वरित १ लाख ३० हजार रूपये शुभम वरघट व दिनेश समद्दर यांना लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी २० फेब्रुवारी रोजी चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तकारदार यांचे प्राप्त तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदाराचे भंगाराचे दुकानाचे बांधकाम न तोडण्यासाठी उर्वरित १ लाख ३० हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून काल, शनिवार २१ फेब्रुवारीला खाजगी इसम दिनेश समद्दर याचेकडे लाच रक्कम १लाख ३० हजार रूपये देण्याचे वरघट यांनी तक्रारदाराला सांगितले. त्यावरून, सापळा कार्यवाही दरम्यान शुभम वरघट यांचेकरिता दिनेश समद्दर यांनी १ लाख ३० हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासकार्य सुरू आहे.

सदरची कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर, माधुरी बावीस्कर अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर, पोलीस उपअधीक्षक, मंजुषा भोसले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार यांनी व सापळा पथक पोशि. अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, पोहवा. रविकांत इंगळे, विजेंद्र वाढई, प्रदिप ताडाम,म.पो.शि. मेघा मोहुर्ले, चापोशि/सतिश सिडाम, संदिप कवरासे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !