एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परिचराच्या खिशात आढळल्या उत्तराच्या सत्यप्रती

0
एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परिचराच्या खिशात आढळल्या उत्तराच्या सत्यप्रती 

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या समक्ष प्रकार अधोरेखित 







चामोर्शी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान चामोर्शी येथील जा.कृ. बोमनवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केलेल्या प्रत्यक्ष भेटीत हा प्रकार समोर आला.

राज्यात 10 फेब्रुवारीपासून बारावी ची परीक्षा सुरू झाली असून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने 18 फेब्रुवारी रोजी सुहास गाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली.त्यावेळी भेटीदरम्यान शाळेतील एका परिचराची झडती घेण्यात आली असता, त्याच्या खिशात उत्तरांच्या सत्यप्रती आढळून आल्या. हा प्रकार उघड होताच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित सत्यप्रती तात्काळ जप्त केल्या. प्राथमिक चौकशीत संबंधित परिचराने शिक्षक सहभागी आहेत असे सांगितले असता त्या शिक्षकांना कारवाईचे ससेमीरा लागणार आहे यात शंकाच उरलेली नाही या घटनेमुळे परीक्षा केंद्रातील देखरेख आणि प्रशासनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या शासनाच्या निर्णयाला या प्रकारामुळे तडा गेल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांनी सांगितले की, या गैरप्रकाराचा सविस्तर अहवाल मंडळाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयास पाठविण्यात आला आहे.वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !