सात वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने केला लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलीसांनी घेतले ताब्यात
चामोर्शी ;-
चामोर्शी शहरातील एका सात वर्षीय चिमुरडीवर शहरातील २७ वर्षीय प्रज्वल नामक युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची किळसवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल दिनांक ८ जुन रोजी सकाळी ९. ३० वाजताच्या दरम्यान घडली. यापूर्वीही या युवकावर २०१९ मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे विशेष म्हणजे सदर आरोपीला चामोर्शी पोलीसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार
शहरातील एका वॉडॉतील फिर्यादीच्या घराच्या स्लॅबवर पेटंचे काम सुरू असताना त्यांचे काम सुरू असताना पेंट करणाऱ्या प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर वय २७ वर्षीय या युवकाने स्लापवर खेळत असलेल्या फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस बाजूला नेऊन लैंगिक अत्याचार केले
याबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी कलम २८०/२०२६ कलम ६४ (एफ), ६५(२) बिएनएस २०२३ सहकलम लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले व सहाय्यक फौजदार रामदास कोडापे हे करीत आहेत.

