ट्रकने दिली दुचाकीला धडक, एक तरूण ठार तर एक गंभीर

0
ट्रकने दिली दुचाकीला धडक, एक तरूण ठार तर एक गंभीर 


आष्टी (अशोक खंडारे):-
एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री ७.३० वाजताचे सुमारास चेकींग नाका आष्टी घ्या वळनावर घडली. 
मृतकाचे नाव विशाल गोपाल सरकार वय २१ वर्षे रा. कालीनगर असे असून मृतक व त्याचा मित्र गंभीर जखमी चिरंजीव प्रदिप मीस्त्री हे चंद्रपूर येथे मोबाईल खरेदी करण्यासाठी गेले होते चंद्रपूर कडून दुचाकी क्र, एम एच ३३ एक जी ८२४५ ने  स्वगावाकडे येत असतांना आष्टी नाक्याजवळ ट्रक क्र. एम एच ४० सी टी ७६३७ चे चालक हरिओम गोपाल सिंह वय ४५ रा.ने दुचाकीला मागेहुन आपले वाहन हयगयीने चालवून जोरदार धडक दिली त्यामुळे दुचाकीस्वार खाली कोसळले व  विशाल यास गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला लागलीच शेजाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आष्टी येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी विशाल यास मृत घोषित केले व गंभीर चिरंजीव वर उपचार सुरू केले सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन ट्रक चालक हरिओम गोपाल सिंह रा. बिसलपूर ता. खेरागड जिल्हा आगरा (उत्तर प्रदेश) यांचे विरुद्ध कलम १०६ (१) १२५ (अ)बि. एन. एस. २०२३ सहकलम १८४ मोवाका नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोहवा राजेश पोत्राजवार हे पोलीस निरीक्षक विशाल काळे या़च्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !