अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जागीच ठार

0
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जागीच ठार


प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९


आष्टी:-
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जागीच ठार

आपल्या मुधोली चक नं २ स्वगावावरुन कर्तव्यावर  गडचिरोली कडे जात असताना  अड्याळच्या वळणावर अज्ञात वाहनाने दुचाकी क्रं एम एच ३३ एन ०१५९  ला जब्बर धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस प्रणय वाडके रा.मुधोली चेक ०२ यांचा अख्खा मेंदूच बाहेर पडला त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले.

पोलीसांना घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस व चामोर्शी पोलीस घटनास्थळी दाखल होउन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चामोर्शी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
अज्ञात वाहनाचा आष्टी पोलीस शोध घेत आहेत. सदर मृतक पोलीसास दोन मुले, पत्नी, आई वडील व बराच आप्तपरिवार आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !