आष्टी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
आष्टी :- येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि १४ ला सकाळी १० ते १०.३० वाजताचे दरम्यान घडली
मृतकाचे नाव सीधार्थ ढेकलूजी निमसरकार वय ३१ रा आष्टी असे असुन दारुचा व्यसनाधीन होता कुणाशीही वादविवाद नसताना आपल्या खोलीमध्ये दार लावून घरामध्येच फाशी लावली सीधार्थ का बरे दार लावून घेतलं आहे म्हणून घरच्यांनी झाकून पाहीले असता फाशी लागून अवस्थेत दिसून आला तेव्हा लागलीच पोलीस स्टेशन येथे माहीती देण्यात आली लागलीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दार काढून आत प्रवेश केला तेव्हा सदर तरुण फाशी लागलेल्या अवस्थेत दिसला तेव्हा पोलीसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतू तो पुर्वीच गतप्राण झाली होता
सदर तरुणाचा शवविच्छेदन केल्यानंतर शव नातलगांना देण्यात आला अधिक तपास आष्टी पोलीस करीत आहेत

