रामपूर (कढोली) येथील इसमाने गळफास घेऊन संपवली आपली जीवनयात्रा
वैनगंगा वार्ता १९
आष्टी (अशोक खंडारे):- चामोर्शी तालुक्यातील रामपूर (कढोली) येथील एका इसमाने गळफास घेऊन जीवन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज दि २५ सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास घडली
मृतकाचे नाव भाऊजी सलामे वय ५४ रा. रामपूर असे असून त्याने आपल्या घरातील मधल्या खोलीत मयालीला भारे बांधण्याच्या रस्सीने गळफास घेतला सकाळच्या सुमारास ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली तेव्हा पोलीस पाटील यांनी आष्टी पोलीस स्टेशन ला या दिली त्यावरुन आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदन केल्यानंतर शव नातलगांच्या सुपूर्द करण्यात आला
भाऊजीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण गुलदस्त्यात आहे आष्टी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात आष्टी येथील पुढील तपास करीत आहेत

