मंगळवेढा येथे गुरूवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी,"जोडे मारो आंदोलन

0

मंगळवेढा येथे गुरूवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी,"जोडे मारो आंदोलन "!


मंगळवेढा (जिल्हा सोलापूर ):-
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित केलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्याच्या जाहीर सभेत, "महारांच्या आईवर लाईन मारा, त्याशिवाय ते आपल्याला बाप म्हणणार नाहीत !"असे वक्तव्य मांग समाजाचे पुढारी लक्ष्मण ढोबळे याने केले असून त्याच्यविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
   ढोबळे याने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ व त्याच्याविरुद्ध योग्य त्या कायद्यानव्ये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात यावी याकरिता गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर २०२६रोजी दुपारी १२ वाजता मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन आयोजित केले असून या आंदोलनात सर्व आंबेडकरी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने कारण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !