अंत्यविधी आटोपून घरी जाताना दिना नदीत कार कोसळून भीषण अपघातः दोघे ठार, तीन गंभीर

0
अंत्यविधी आटोपून घरी जाताना दिना नदीत कार कोसळून भीषण अपघातः दोघे ठार, तीन गंभीर


अहेरीः नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या अंत्यविधीनंतर नातेवाईकांचे चारचाकी वाहन (एम एच ३३ व्हि.८२४९) खमनचेरू आणि बोरी दरम्यान असलेल्या दीना नदीच्या पुलावरून कोसळले. २० जानेवारी रोजी दुपारी घडलेल्या अपघातात यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३, आष्टी) व सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५, बोरी) ठार झाले. अभिजीत यादव कोलपाकवार (४०, आष्टी), अर्चना यादव कोलपाकवार (आष्टी) व पद्मा सत्यनारायण कोलपाकवार (बोरी) गंभीर जखमी असून चंद्रपूरला हलवण्यात आले.





नागेपल्ली येथिल रवींद्र तंगडपल्लीवार यांचा 19 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आलापलीच्या जंगल परिसरात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मोका पंचनामा करून सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांना मृतदेह सोपविले. २० जानेवारी रोजी रवींद्र तंगडपल्लीवार यांची नागेपल्ली येथे अंत्यविधी करण्यात आली. या अंत्यविधीसाठी विविध गावातील नातेवाईकांनी हजेरी लावली. यादव विठ्ठल कोलपाकवार पत्नी अर्चना यादव कोलपाकवार आणि मुलगा अभिजित यादव कोलपाकवार, सुनील मुरलीधर कोलपाकवार, पद्मा सत्यनारायण कोलपाकवार ही मंडळी देखील अंत्यविधी आटोपून आपल्या चारचाकी वाहनाने आष्टीकडे निघाले होते. दरम्यान खमणचेरू नंतर दीना नदीच्या पुलावरून सदर वाहन कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. लगेच त्यांना उपचारार्थ अहेरी येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान यादव विठ्ठल कोलपाकवार आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार यांचा मृत्यू झाला. तर यादव कोलपाकवार यांची पत्नी अर्चना आणि मुलगा अभिजीत तसेच पद्मा सत्यनारायण कोलपाकवार गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार अभिजित कोलपाकवार हा आपली चारचाकी वाहन चालवत होता. अभिजीत हा आपल्या आई-वडिलांना घेऊन आष्टी वरून निघाला होता. दरम्यान बोरी येथून चुलत काका सुनील मुरलीधर कोलपाकवार आणि काकू पद्मा सत्यनारायण कोलपाकवार यांना नागेपल्ली गाठला. अंत्यविधी आटोपून परत घराकडे जाताना देखील हीच पाचजण वाहनात होते. काका सुनील आणि काकू पद्मा यांना बोरी येथे सोडून अभिजीत आपल्या आई-वडिलांना घेऊन आष्टी कडे जाणार होता. मात्र काळाने घाला घातला यात दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कोलपाकवार कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !