आष्टी येथे एका तळीरामाने गळफास घेऊन केली आत्महत्या

0
आष्टी येथे एका तळिरामाने गळफास घेऊन केली आत्महत्या




आष्टी (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे एका तळिरामाने गळफास घेऊन आज दि. २० जानेवारी ला सायंकाळचे सुमारास आत्महत्या केल्याचे उघडकीस आले
आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव कल्पेश झाडे वय ४५ मु. नंलेश्वर ता. मुल जिल्हा चंद्रपूर हल्ली मुक्काम आष्टी असे असून हे दाम्पत्य दोन मुलासह आष्टी येथे दिड वर्षा पासून राहत होते
मृतक हा दारुचा व्यसनाधीन होता त्यामुळे पती पत्नी मध्ये नेहमी भांडन होत होते घटनेच्या दिवशी सायंकाळी पाच ते सहा वाजता चे दरम्यान दोघांचे भांडण झाले तेव्हा पत्नी घराबाहेर रोडवर जाऊन बसली होती त्यावेळी कल्पेश हा घरात होता सात वाजता पत्नी घरी गेली तेव्हा दाराला आतून कडी लावली होती तिने पतीला आवाज दिला पण प्रतिसाद मिळाला नाही म्हणून जोराने दार ढकलला व ती आत बघते तर कल्पेशने टिनाच्या शेडच्या फाट्याला गळफास लावून दिसून आले तेव्हा तीने शेजारच्या लोकांना बोलावून घेतले लागलीच शेजारच्या लोकांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली त्वरीत पोलिस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला . शवविच्छेदन झाल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृतकाचे मागे एक मुलगा एक मुलगी पत्नी असून यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे
त्याने आत्मा का केली हे अजुनही कळले नाही अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !