........तर लक्ष्मण ढोबळे च्या सत्तर पिढीला घोडा लावणारे आम्ही! - डी. के. साखरे

0
........तर लक्ष्मण ढोबळे च्या सत्तर पिढीला घोडा लावणारे आम्ही!
   -  डी. के. साखरे 


मंगळवेढा:-
महार समाज माजुरा, महार समाज भांडखोर व महारांच्या आईवर लाईन मारा त्याशिवाय ते तुम्हाला बाप म्हणणार नाहीत ! असे म्हणणाऱ्या लक्ष्मण ढोबळेच्या आईला घोडा लावणार नाही तर लक्ष्मण ढोबळेच्या सत्तर पिढीला घोडा लावणारे आम्ही आहोत असा स्पष्ट इशारा दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष डी. के. साखरे यांनी दिनांक 24 सप्टेंबर रोजी मंगळवेढा येथे केलेल्या जोडे मारो आंदोलन प्रसंगी दिला.
    ढोबळे हे वारंवार विषय सोडून महार समाजाबद्दल अपशब्द वापरत असून दिनांक 13 सप्टेंबर रोजी नांदेड येथे महार - बौद्ध समाजातील महिलांच्या बद्दल केलेले अपमानास्पद वक्तव्य महार -बौद्ध समाजाच्या जिव्हारी लागले असून संपूर्ण महाराष्ट्रात ढोबळे यांच्याबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.


  प्रांत कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेत माजी उपगराध्यक्ष विजय खवतोडे म्हणाले की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही एका जातीला आरक्षण दिले नसून अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या समूहाला दिलेले आहे.त्यामुळे आरक्षण उपवर्गीकरणाची केलेली मागणी ही संकूचित वृत्तीची असून मातंग समाजातील ठरावीक व्यक्तीनीं केलेली आहे. पुढे बोलताना नाव न घेता खवतोडे म्हणाले की वृद्धापकाळाकडे वाटचाल सुरू असताना त्या महान व्यक्तीने स्वतःच्या मुलाचे व मुलीचे करियर खराब केले आहे.तर वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा शहर अध्यक्ष अजय गाडे म्हणाले की त्या वाचाळवीराने यापुढे कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द वापरले तर त्याला व त्याची चाटुगीरी करणाऱ्या भिकारचोटला महाप्रसाद देण्यात येईल.नगरसेविका सीमा बुरजे यांनी आपल्या भाषणात ढोबळे यांच्या कथीत वक्तव्याचा निषेध करत त्यांचे वर्तन अशोभनीय असल्याचे सांगितले  यावेळी ज्येष्ठ नेते मारुती गायकवाड, अशोक माने, बाबू वाघमारे, ऍड. दत्तात्रय खडतरे, सिद्धार्थ लोकरे आदींनी आपल्या भाषणातून ढोबळे यांच्यावर सडकून टीका केली.
  याप्रसंगी नगरसेवक प्रवीण खवतोडे, विक्रम शेंबडे , पंकज पाराध्ये, येताळा खरबडे, लक्ष्मण गायकवाड, सागर खरबडे,
विजय काटे, पद्मिनी शेवडे, मनीषा काटे, सुरेखा काटे, उज्वला काळे व सिना शिंदे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते. शेवटी प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार मोरे यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !