बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जयंती केली गडचिरोली येथे साजरी
वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली (अशोक खंडारे) :-२५ सप्टेंबर -- रिपब्लिकन नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जयंती शुक्रवारी 'ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी'च्या जिल्हा गडचिरोली शाखेतर्फे साजरी करण्यात आली.
सकाळी शहरातील इंदिरा चौकात रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या हस्ते बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि या महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, बीआरएसपीचे जिल्हा प्रमुख मिलिंद बांबोडे, संविधान फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक गौतम मेश्राम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत, आरपीआयचे राज्य सचिव प्रा. राजन बोरकर, कास्ट्राईब टीचर्स युनियनचे राजकुमार घोडेस्वार, रिपब्लिकन सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, युवा अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, बीआरएसपी नेते पुरुषोत्तम रामटेके, विलास कुंभारे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, सिद्धार्थ खोब्रागडे, विठोबा साखरे, भरत जांभुळकर, दुष्यंत तुरे, मधुकर टेंभुर्णे, अविनाश तुरे, गौतम दुर्गे, सुनील उराडे, महिला शहर प्रमुख वनमाला झाडे आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या सुनीता रायपुरे, नमिता वाघाडे, पूनम भैसारे, कल्पना रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व कार्यकर्त्यांनी बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर चांदेकर भवन येथे जयंती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात वक्त्यांनी दिवंगत रिपब्लिकन नेत्याच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर रिपब्लिकन चळवळीचे खरे पुरस्कर्ते म्हणून त्यांचे वर्णन केले आणि समाजातील दलित, मागास व वंचित घटकांच्या व्यापक हितासाठी रिपब्लिकन चळवळ पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजन बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रल्हाद रायपुरे यांनी केले.

