गडचिरोली तालुक्यात ‘डीसीएस’ (डिजिटल क्रॉप सर्वे) अंतर्गत ई-पीक नोंदणी सुरू

0


गडचिरोली तालुक्यात ‘डीसीएस’ (डिजिटल क्रॉप सर्वे) अंतर्गत ई-पीक नोंदणी सुरू;
शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करण्याचे तहसिलदार गडचिरोली यांचे आवाहन


गडचिरोली :-

 केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०२६-२७ करिता गडचिरोली तालुक्यात 'डिजिटल क्रॉप सर्वे' (DCS MH) या नवीन मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी आणि नोंदणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक नोंदणी विहित मुदतीत करून घ्यावी, असे आवाहन महसूल व कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

  शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार, यंदाची पीक नोंदणी मोहीम ११ ऑगस्ट, २०२६ ते १० नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.  आता शेतकरी स्वतः मोबाईलवरून पीक नोंदणी करणार नसून, शासन नियुक्त सहाय्यकांद्वारे केंद्र सरकारच्या Digital Crop Survey (DCS-MH) ॲपद्वारे प्रत्यक्ष शेतात जाऊन ९० दिवसांत (ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६) ही पाहणी पूर्ण केली जाईल. 

  ई-पीक पाहणी मध्ये नोंदवलेल्या माहितीचा थेट वापर विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी केला जातो. यामध्ये प्रामुख्याने

पीकविमा (Crop Insurance) क्लेम मंजूर करण्यासाठी.
नैसर्गिक आपत्तीत मदत मिळवण्यासाठी.
कृषी कर्ज आणि कृषी सांख्यिकीच्या कामांसाठी.
केंद्र सरकारच्या 'AgriStack' अंतर्गत डिजिटल सातबारा अद्ययावत करण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे.

 शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणीसाठी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक किंवा महसूल सेवक यांच्याशी संपर्क साधावा. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता, गडचिरोली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकांची नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सागर कांबळे, तहसिलदार गडचिरोली यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !