शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दोन रुग्णवाहिकांमुळे वाचले अपघातग्रस्तांचे प्राण
प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
दिनांक 15 सप्टेंबर शुक्रवारला आष्टी- मुलचेरा मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. यात संतोष मडावी आणि प्रकाश नरोटे हे गंभीर जखमी झाले. यावेळी मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यात अडचण निर्माण झाली. ही बाब शिवसेनेचे मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला यांना कळताच त्यांनी स्वतः ची रुग्णवाहिका घेऊन तातडीने अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावले व अपघातात गंभीर जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांना होताच त्यांनी तातडीने रुग्णालय गाठले. अपघात ग्रस्तांना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविणे गरजेचे होते. याच वेळी आष्टी येथील रुग्णालयात गोंडपिपरी तालुक्यातील सालेझरी येथील युवी बोरकुटे ही मुलगी भरती होती तीला सुध्दा पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याने या दोन गंभीर जखमी अपघात ग्रस्त व आजारी मुलगी यांना गौरव बाला व राकेश बेलसरे यांनी आपली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. व उपचारासाठी आर्थिक मदतही केली. ऐन सणासुदीच्या दिवशी या दोन रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी तातडीने उपलब्ध झाल्याने जखमीवर तातडीने उपचार करण्यास मदत झाली. याच दिवशी रात्री कोनसरी जवळ अनखोडा येथील प्रतीक ढपसक या युवकाचा अपघात झाला व यालासुध्दा या रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले व या रुग्णवाहिके मुळे एकप्रकारचे जीवनदान मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे व मूलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला यांचे आभार मानले.

