आष्टीच्या तरुणीची कोनसरी वनविभागाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0
आष्टीच्या तरुणीची कोनसरी वनविभागाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 


आष्टी:-
येथील एका तरुणीने कोनसरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. १० जून ला सकाळी १० वाजता उघडकीस आली 
आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अंजली राजू खडसे वय २२ वर्षे रा आष्टी असे आहे 
सदर मुलीची आई सुरेखा (खडसे) आत्राम या कोनसरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवीका आहेत त्या आपल्या स्वगृही आष्टी येथे दोन मुली सह राहत असताना सकाळी अंजली घरातून केव्हा निघून गेली हे त्यांना माहीत नाही त्यांना एकदम मृत्यूची बातमी मिळाली व त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले 
सदर मुलीचे लग्न मुल येथील अनुराग कन्नाके यांचे सोबत जुळले होते अंजली चा आज १० जून ला परिक्षेचा पेपर असल्याने तिला शाळेत पोहचविण्यासाठी अनुराग आष्टी येथे आला तेव्हा तिने आत्महत्या केली असे कळले त्याचेवर दुःखाचे डोंगर कोसळल्याने तो धायमोकलून रडू लागला .
काल दि ९ जून ला रात्रो ९ वाजता त्या दोघांचे संभाषण झाले होते मात्र आज सकाळी त्याने संपर्क केला असता समोरुन रिस्पॉन्स मिळाला नाही असे तो बोलून दाखवत आहे 
तिने असे टोकाचे पाऊल का उचलले हे सध्यातरी कळायला मार्ग दिसत नाही मात्र पोलीस तपासात निष्पन्न होईल.
आष्टी पोलीस स्टेशन ला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आष्टी येथे पाठविण्यात आला आहे 
अधीक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलीस उपनी भाग्यश्री जगताप व पोलीस करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !