आष्टी येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहातील स्वयंपाकघराला अचानक लागली आग, सिलेंडरचा भडका

0
आष्टी येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहातील स्वयंपाकघराला अचानक लागली आग, सिलेंडरचा भडका 


आष्टी (अशोक खंडारे):-

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृहात स्वयंपाकघराला अचानक आग लागली या घटनेमुळे वस्तीगृहातील मुलींच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, वस्तीगृहात कोणतीही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

घटनेच्या वेळी वस्तीगृहात जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. अधिकारी सुस्त असून अधीक्षकही अनुपस्थित असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.

आष्टी येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहातील स्वयंपाकघराला लागलेल्या आगीची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.


स्वयंपाकघरातील सिलेंडरमुळे आग भडकण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, वस्तीगृहात अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.

शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह येथे कोणत्याही प्रकारचे अग्निशमन लावलेले नाही किंवा सेफ्टी म्हणून काहीच दिसून येत नाही शासन मुलींच्या जीवाशी खेळत आहे काय असा प्रश्न नागरिक करू लागलेले आहे

 सदर मुलींच्या वस्तीगृहात जेवणाकरिता कंत्राटदाराची  नियुक्ती केलेली आहे मात्र अजूनही कांत्राटदार या ठिकाणी आलेला नाही आणि सदर जेवणाकरिता एका महिलेला  नेमणूक करून तीच स्वयंपाक बनवून वाढत असते मात्र कोणत्याही प्रकारची सेफ्टी दिसून येत नाही शासनाने वस्तीगृह वाऱ्यावर सोडले काय असा प्रश्न आज निर्माण होत आहे
आदिवासी मुलींना वाऱ्यावर सोडून गृहपाल उपस्थित राहत नाहीत त्यामुळे त्यांचेवर कारवाई करण्यात आली पाहिजे व कंत्राटदाराचे कत्राट काढून घेण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !