भाजपा नेते विवेक खिलारे यांच्यावर प्राणघातक हल्ला
डोंगरगावात तणावपूर्ण शांतता
डोंगरगाव (ता.मंगळवेढा ) भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे यांच्यावर सोमवार दिनांक १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास गावातीलच जातीयवादी समाजकंटकानी हा हल्ला केल्याचे समजते. डोंगरगाव यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदाकरीता महार समाजाच्या व्यक्तीचे नाव का सुचविलेस ? व मारुती मंदिरावरती स्पीकरद्वारे लावलेल्या कव्वाली ची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार का दिली याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्यात विवेक खिलारे यांच्या डाव्या हातास गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर सोलापूर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खिलारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.