एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार आष्टी वैनगंगा नदी पुलावरील घटना

0
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार, आष्टी वैनगंगा नदी पुलावरील घटना 



आष्टी:-
आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर एसटी बसची दुचाकीला मागून  जब्बर धडक बसली या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला.ही घटना आज दि . १७ जून ला दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास घडली.
मयत युवकाचे नाव नितीन सुरेश खुटेमाटे, वय ३४ वर्षे , रा. आष्टी असे आहे.
एस. टी.महामंडळाची अहेरी आगाराची बस क्र.एम.एच.१४ , एल . एक्स.५६५८ माहूर येथून अहेरीला जात होती. व गोंडपिपरी कडून आष्टीकडे दुचाकीने नितीन खुटेमाटे येत होता. दरम्यान पुलाच्या सुरवातीलाच  बसने दुचाकीला मागून धडक दिली यामध्ये दुचाकी बसमध्ये अडकली व त्यात नितीन खुटेमाटे याचा जागीच मृत्यू झाला. 
त्याचे शव आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले.शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. मयत युवक हा अविवाहित होता.तो आंबेडकर चौकात हॉटेल चालवित होता.त्याच्या आकस्मिक निधनाने आष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या मागे आई , एक भाऊ , एक बहीन, जावई व बराच मोठा परिवार आहे.अपघात स्थळ गोंडपिपरी हद्दीत येत असल्याने पुढील तपास गोंडपिपरीचे पोलीस निरीक्षक हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !