चामोर्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाची आढावा बैठक संपन्न.
चामोर्शी- दि.१२/०६/०२५ रोजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे, बबलुभैया हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ नेते व्येंकटेश बुर्ले,तालुकाध्यक्ष निशांत नैताम,तालुकाध्यक्ष डॉ.नोमेश्वर जुवारे व जिल्हासंघटन सचिव तथा तालुका कार्याध्यक्ष डॉ.हेमंत भाकरे पाटील यांच्या नेतृत्वात चामोर्शी येथे आढावा बैठक घेण्यात आली.
व बैठकीचा आढावा घेत असताना आ . डॉ.राजे धर्मारावबाबा आत्राम यांनी पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली व जनतेची कामे करूनच लोकांभीमुख जनतेमध्ये जाऊन होऊ घालणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करायच्या सूचना उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दिल्या.
त्यावेळी राहुल नैताम अध्यक्ष गडचिरोली विधानसभा,ज्येष्ठ नेते डॉ.थामदेव दुधबळे,प्रणय बुर्ले अध्यक्ष गडचिरोली विधानसभा तथा जिल्हाउपाध्यक्ष रा.यु.काँ.,पुष्पा बुर्ले जिल्हाउपाध्यक्ष रा.म.काँ.,रुपाली दुधबावरे तालुकाध्यक्ष रा.म.काँ. पुरुषोत्तम खेडेकर तालुकाध्यक्ष सेवादल रा.कॉं.पा.चामोर्शी ,बंडू मेश्राम तालुकाध्यक्ष आदिवासी आघाडी रा.कॉं.पा.चामोर्शी,अमोल कुळमेथे शहर अध्यक्ष रा.कॉं.पा.गड. संदीप सोयाम,मुखरू तांदूळकर आदींसह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.