गडचिरोली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न

0

गडचिरोली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न



 गडचिरोली:- जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अधिवेशन रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ ला शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड, गडचिरोलीचे सभागृहात उत्साहात साजरे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि ग्रंथालय शास्त्राचे जनक सी रंगराजन यांचे प्रतिमेचे पूजन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्षस्थान दिलीपराव म्हस्के माजी न्यायाधीश यांनी भूषविले , उद्घाटक म्हणून संकल्प फाउंडेशन चे संस्थापक डॉक्टर पंकज नरुले तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह प्राचार्य भाऊराव पत्रे, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदीश  म्हस्के, सचिव रवींद्र समर्थ,कोषाध्यक्ष अरुण मुनघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी मानवी जीवनात ग्रंथ वाचनाचे महत्त्व विशद करून सर्वांना उदबोधित केले. मानवी जीवनाला तसेच मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या रानभाज्या, कंदमुळे,वनस्पती यावर "रानभाज्याच्या जगात " हे पुस्तक लिहिणाऱ्या शेतकरी गृहिणी सौ संगीता ठलाल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गुणगौरव करण्यात आला.तसेच मातृरक्षा या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले दुसरे सत्रात आजचे वाचकांचे दृष्टीने ग्रंथालयाच्या अद्यावतीकरणाची गरज या विषयावर  जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी ग्रंथालयाचे आधुनिकीकरणात ग्रंथालयाचे संगणीकरण, विविध अँप चा उपयोग, ए आय चा उपयोग, ई बुक, डिजिटल वाचनालय ही आजची गरज आहे याचे महत्त्व विशद केले तर प्राध्यापक संध्याताई येलेकर यांनी कपाटातील ग्रंथाची स्थिती विशद करून ग्रंथसंपदेचा सर्वसामान्यांना कसा उपयोग होईल यावर प्रकाश टाकला. शेवटचे सत्र खुले अधिवेशनात 1. ग्रंथालयांची प्रलंबित असणारी ४०% वाढ शासनाने मंजूर करून अदा करावी 2.सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती देण्यात यावी  3. नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता व वर्गाबदल देणे सुरु करावे 4.ग्रामीण भागातील १ ते १० पटसंख्या असणाऱ्या प्राथमिक शाळा शासनाने बंद करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करू नये यासारखे महत्त्वाचे ठराव पारित करून उपस्थित सर्वांचे आभार मानून अधिवेशनाचा समारोप झाला.कार्यक्रमाचे संचालन श्री केशवन कावंडर यांनी केले. हे अधिवेशन यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष जगदीश म्हस्के, भाऊराव पत्रे सचिव रवींद्र समर्थ, अरुण मुनघाटे अशोक चलाख, मुकुंद म्हशाखेत्री, संतोष मशाखेत्री, प्रभाकर पाल, विकास पाल,अजय जक्कुलवार,हरिराम मातेरे, प्रमोद शेंडे, अविनाश निकोडे, दिलीप म्हशाखेत्री, डोमाजी मुणघाटे, देवराव चौधरी, स्वप्नील पीपरे, रविसागर चुधरी, देवेंद्र ब्राम्हणवाडे,अनंत झंजाड,कु. प्रियंका म्हस्के, कु सुप्रिया धोडरे, कु कांचन आत्राम  यांनी मोलाचे सहकार्य केले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !