शिक्षकच नाहीत तर विद्यार्थ्यांना शिकविणार कोन म्हणून उमरी शाळेला पालकाऊ ठोकले कुलूप
आष्टी
कोनसरी केंद्राअंतर्गत येणाऱ्या उमरी प्राथमिक शाळेत शिक्षकच नसल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होणार नाही तोपर्यंत शाळेत विद्यार्थी पाठविणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी येथे एकूण ०१ ते ०७वर्ग असुन शाळेत १०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत ०५ शिक्षकांची पदे आहेत. त्यापैकी २ शिक्षकांची बदली झाल्यामुळे ते शाळेतुन
रिलिव्ह झाले आहेत. दीड महिन्यापासून त्यांच्या जागी नवीन शिक्षक अद्याप रुजू झाले नाहीत. परिणामी शाळेत सध्या फक्त ०३ शिक्षक काम पाहत
नन
असून दीड महिन्यांपासून शाळेचे नियमित कामकाज सुरळीतपणे चालविण्यात अडचणी येत आहेत.
यामुळे बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी तातडीने नवीन शिक्षक नेमणूक करून शाळेचे कामकाज नियमित करावे. क्रीडा विभागात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जो पर्यंत ०२ शिक्षकांची भरती होणार नाहीं, तोपर्यंत गावातील पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाही असाही ईशारा पालकांनी दिला आहे,

