पाणी शेंदतांना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या इसमाचा मृत्यू
आष्टी येथील घटना
आष्टी (अशोक खंडारे):- येथील एका तरुणाचा पाणी शेंदतांना तोल जाऊन विहिरीत पडलेल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दि २२ मार्च ला सायंकाळचे चार वाजण्याच्या सुमारास घडली
मृतकाचे नाव श्रीकांत (सोनु) नानाजी दुर्गे वय ३३ वर्षे रा. आष्टी असे असून तो मजुरीचे काम करत होता आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरासमोरील विहिरीतून पाणी बकेटने शेंदत असताना तोल जाऊन विहिरीत कोसळला बकेटचा दोर अंगाला गुंडाळला गेला त्यामुळे तो विहिरीतच गतप्राण झाला
आष्टी पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह विहीरीबाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे शवविच्छेदन झाल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
श्रीकांत च्या पच्छात आई, वडील, पत्नी एक मुलगा एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे अधिक तपास आष्टी पोलीस करीत आहेत

