गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

0
गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न



गणपूर (रे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली चक नं १ येथे गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद दि २७ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली.केंद्रप्रमुख श्री.कपिल सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिक्षण परिषदेत शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षण परिषदेत शिक्षण निपुण महाराष्ट्र, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी, अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठाचे नमुना सादरीकरण, यशोगाथा (Best Practices) सादरीकरण,शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केंद्रनिहाय कृती आराखडा, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा कार्यक्रमाचा आढावा व समस्या निराकरण, DIKSHA Courses व AI संदर्भातील माहिती, मूल्यवर्धन – सत्र परिणामासाठी कार्यान्वयन, नवभारत साक्षरत,तसेच आनापान ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता, मानसिक शांतता व सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत मुधोलीचे उपसरपंच श्री दिलीप वर्धलवार होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक शेडमाके, नामदेव वर्धलवार, संजय शेडमाके, विशेष शिक्षक श्री.रवीभाऊ खेवले केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण परिषदेत शिक्षकांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण करून अनुभवांची देवाणघेवाण केली. त्यामुळे परिषद शिक्षकांसाठी प्रेरणादायी आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी दिशादर्शक ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुधोली शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवराव वर्धलवार यांनी केलेतर आभार प्रदर्शन श्री. संतोष नागरगोजे यांनी केले. शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद यशस्वीपणे संपन्न झाली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !