अण्णासाहेब आसबे महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने सन्मानित

0

अण्णासाहेब आसबे महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने सन्मानित


 सोलापूर प्रतिनिधी : मंगकवेढा तालूक्यातील दामाजी नगर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब आसबे यांना "साप्ताहिक आपली चळवळ" आणि "जनसंवाद न्यूज" यांच्यामार्फत दिला जाणारा 2026 चा महाराष्ट्र आयकॉन हा पुरस्कार नुकताच सोलापुर येथे एका शानदार समारंभत प्रदान करण्यात आला. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीने काम करणारा आणि प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा एक लढवय्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून अण्णासाहेब आसबे यांची जनमानसात प्रतिमा आहे .दिनांक 23 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन येथे झालेल्या दिमागदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या लोकप्रिय कवयित्री तरुणांच्या आयकॉन गुंजन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब आसबे यांचे सर्व कुटुंब ,महाराष्ट्राचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच दैनिक अचूक निदान चे संपादक डी.के. साखरे , सेवानिवृत्त शिक्षक बंडू माळी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे आणि अधिक जोमाने मी माझे सामाजिक कार्य सुरू ठेवेल अशी कृतज्ञतेची भावना हा पुरस्कार स्वीकारताना अण्णासाहेब आसबे यांनी व्यक्त केली. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जन माणसांमधून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !