शुल्लकच्या वादातून तरुणावर सतूरने केला वार , तरुण गंभीर जखमी

0

शुल्लकच्या वादातून तरुणावर सतूरने केला वार , तरुण गंभीर जखमी 


आष्टी:- येथील चामोर्शी रोडवरील मंडल चिकन शॉप येथे चिकन घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला शुल्लक च्या वादातून सतुरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दि. २६ ऑगस्ट ला दुपारच्या सुमारास घडली 
गंभीर जखमी तरुणाचे नाव सुरज (गुड्डू) भारत दुर्गे वय ३० रा आष्टी असे असुन तो चिकन घेण्यासाठी त्या दुकानात गेलेला होता तीथे सदर इसम खुर्चीवर बसले होते तेव्हा चिकन शॉप येथे गाडीवर चालक म्हणून काम करणारे विश्वजीत राबीन मंडल यांनी खुर्ची वर पाय ठेऊन बसू नकोस असे म्हणत शुल्लक वाद झाला असता विश्वजीत राबीन मंडल रा. मार्कंडा (कं) याने सुरज याच्या मांडीवर व हाताच्या अंगठ्याला सतुरने जोरदार प्रहार केला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे लागलीच तिथे असलेल्या काही मुलांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले


आष्टी पोलीस स्टेशन येथे माहीत मिळताच रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व विश्वजीत राबीन मंडल यास व सतुरला घेऊन चौकशी करीता त्यास ताब्यात घेतले त्यांवर गुन्हा क्रमांक २५४/२०२६ कलम भारतीय न्याय संहिता ११८(१)व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला 
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार पोतराजवार करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !