५० वर्षीय ईसमाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

0
५० वर्षीय ईसमाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार 

पोलीसांनी केली आरोपीस अटक


मूल :   पोलीस स्टेशन मूल हद्दीतील सिंताळा, ता. मूल येथे  ५० वर्षीय ईसमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.

यातील पीडित अल्पवयीन मुलगी व सदर गुन्ह्यातील आरोपी देवराव तुकाराम वासेकर, वय 50 वर्षे, रा. सिंताळा, ता. मूल हे एकाच गावातील रहिवासी असून आरोपी हा पीडितेचा नात्याने चुलत आजोबा लागतो.

दिनांक 22.08.2026 रोजी दुपारी सुमारे २.३ वाजताचे सुमारास पीडिता ही तिच्या आईच्या सांगण्यावरून आरोपीसोबत घरच्या शेतातील पाणी व पाटाच्या खांडी बुजविण्यासाठी शेताकडे जात होती. शेताच्या परिसरात आरोपीने पीडितेला पाटाची खांड बुजविण्यास सांगितले. पीडिता खांड बुजविण्यासाठी वाकलेली असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करून तिच्याशी लैंगिक अत्याचार केला.

घटनेनंतर पीडितेने सदर प्रकार तिच्या आईस सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन मूल येथे अपराध क्रमांक 613/2026, कलम 64(2)(f)(I) BNS सह कलम 4 व 6 POCSO Act अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने तातडीने तपासाची कार्यवाही करून आरोपी देवराव तुकाराम वासेकर, वय 50 वर्षे, रा. सिंताळा, ता. मूल यास अटक केली आहे.

 गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोउपनि नरेश उरकुडे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !