आनंदग्राम येथील वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या
आष्टी (अशोक खंडारे):- आनंदग्राम येथील एका वृध्दाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही घटना आज दि २२ मार्च लाख एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली
मृतकाचे नाव मनोरंजन श्रीकांत टिकेदार वय ७१ वर्षे रा. आनंदग्राम ता. चामोर्शी असे असून सदर वृध्दाने आजाराला कंटाळून आपल्या घरामागे असलेल्या जांबाच्या झाडाला गळफास लावला आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला
अधीक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हरिश्चंद्र झाडे, पोलीस शिपाई वैभव हेडावू हे करीत आहेत

