चक्क ॲम्बुलन्स मधून अवैध दारूची तस्करी, आष्टी पोलीसांनी उधळला डाव

0
चक्क ॲम्बुलन्स मधून अवैध  दारूची तस्करी, आष्टी पोलीसांनी उधळला डाव 

 १२ लाख २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत 



आष्टी (अशोक खंडारे) :- चक्क ॲम्बुलन्ससारख्या अत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाचा गैरवापर करून अवैध दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा आष्टी पोलिसांनी डाव उधळून लावला आहे. या कारवाईत तब्बल 12 लाख 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास आष्टी ते आलापल्ली मार्गावर महात्मा  ज्योतिबा फुले महाविद्यालयाजवळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला व वाहनाची चौकशी केली असता दारु आढळून आली. यावेळी एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ईको क्र.एम एच ३४ बिआर ५७५३ ही गाडी ज्यावर लाल अक्षरात ‘ॲम्बुलन्स’ असे लिहिले होते, संशयावरून थांबवून तपासणी करण्यात आली.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आला. यात 4000 देशी दारूच्या निपा, 864 बिअरच्या बाटल्या, तसेच रॉयल स्टॅग व ऑफिसर चॉईस ब्लू या ब्रँडच्या महागड्या दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी सुलतान महोम्मद शेख वय २७  व सौरभ चंदू गायकवाड वय ३३ या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी असून मजुरीचा व्यवसाय करतात.
अवैध दारूची वाहतूक करत होते. त्यामुळे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ), 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीसांनी केली 

सध्या पोलिस या प्रकरणातील संपूर्ण नेटवर्कचा तपास करीत असून, या मागे आणखी मोठी साखळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !