जिमलगट्टा पोलीसांची मोठी कारवाई, देशीदारु सह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल केला जप्त
जिमलगट्टा:-
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असल्याने उत्सव कालावधीत अवैद्य दारु विक्रेते व दारुची वाहतुक तसेच पुरवठा करणारे यांची गोपनीय माहिती काढुन दारु बंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्याकरीता संपूर्ण गडचिरोली जिल्हातील पोलीस स्टेशन, उप पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र येथील प्रभारी अधिकारी यांना मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. रमेश सा. गडचिरोली, यांनी आदेशीत केले असल्याने उप पोलीस स्टेशन जिमलगट्टा येथील प्रभारी अधिकारी. विशाल गडकर यांनी गोपनीय बातमीदार यांना सक्रीय करुन अवैद्य दारु विक्रेते व दारुची वाहतुक तसेच पुरवठा करणारे यांची माहिती घेणे करीता गोपनीय बातमीदार यांचेकडुन माहिती घेत असतांना दिनांक १५.१०.२०२६ रोजी मौजा आलापल्ली ते सिरोंचा कडे जाणाऱ्या रोडने पांढऱ्या रंगाचे हुंडाई क्रेटा कंपनीची चार चाकी वाहन क्र एम.एच ४० बी.ई २२९९ या वाहनाने रॉकेट देशी दारुची वाहतुक करुन पुरवठा करणार आहेत, अशी खात्रीशीर गोपनीय बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाल्याने प्रभारी अधिकारी विशाल गडकर, परि. पोउपनि रोहीत सावंत, उप पोस्टे जिमलगट्टा येथील पोलीस अंमलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जिमलगट्टा येथील पोलीस अंमलदार असे संयुक्त पणे मिळालेल्या माहिती प्रमाणे जिमलगट्टा टी पाईंट येथे रवाना होवुन सदर वाहनावर लक्ष ठेवुन पाळत ठेवले असता सदर क्रेटा चार चाकी वाहन जवळ येताच वाहन चालक यास थांबविणे करीता हात दाखवुन ईशारा केले असता चालकास पोलीस पार्टी असल्याचे समजल्याने चालक यांनी पोलीसांपासुन काही अंतरावर आपल्या ताब्यातील चार चाकी वाहन रोडवर थांबवुन वाहन सोडुन जंगलामध्ये फरार झाला सदर वाहनाची चौकशी केली असता वाहनामध्ये ३५ नग खाकी रंगाचे खरडयाचे बॉक्स ज्यावर रॉकेट देशी दारु संत्रा असे लिहुन असलेले ३५ बॉक्समध्ये १०० नग प्रमाणे एकुण ३५०० नग निपा बॅच नं B.NO. 012 SEP. 26.M3B (प्रति नग निप विक्री किंमत १००/- रु प्रमाणे) एकुण ३५०,०००/- रु चा मुद्देमाल व एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची चार चाकी हुंडाई कंपनीची क्रेटा वाहन किंमत ६००,०००/- रु असा एकुण ९५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल अवैद्यरित्या बिनापास परवाना चिल्लर विक्री व पुरवठा करण्याकरीता दारुची वाहतुक करीत असता मिळुन आल्याने उप पोस्टे जिमलगट्टा येथे मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक एम. रमेश गडचिरोली, अपर पोलीस अधिक्षक हर्षवर्धन बी.जे अहेरी, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी जिमलगट्टा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी. समाधान पाटील सिरोंचा अतिरीक्त कार्यभार जिमलगट्टा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास उप पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी विशाल गडकर व परि पोउपनि रोहीत सावंत उप पोस्टे जिमलगट्टा करीत आहेत

