शेतात काम करीत असलेल्या महीलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

0

शेतात काम करीत असलेल्या महीलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू





चंद्रपूरः- शेतीचे काम करत असताना वाघाने हल्ला केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पतीच्या डोळ्यांदेखतच वाघाने पत्नीवर झडप घालून तिला जंगलात ओढत नेले. ही थरारक घटना चिमूर तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांतर्गत पळसगाव वनपरिक्षेत्रात घडली. उषा अंकुश गुरुनुले (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.

उषा गुरुनुले या सोयाबीन कापणीचे काम आटोपल्यानंतर पती अंकुश गुरुनुले आणि गावातील एका सहकाऱ्यासोबत जंगलालगतच्या शेतात धान पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. पती डिझेल इंजिन सुरू करण्यात व्यस्त असताना उषा शेतातील तण काढत होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. वाघाने त्यांच्या मानेचा चावा घेत त्यांना जंगलाच्या दिशेने ओढत नेले. पतीच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि चिमूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !