स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय आलापल्ली येथे महापरिनिर्वाण दिन साजरा
आलापल्ली:- येथील स्व. लक्ष्मीबाई कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे कार्य. प्राचार्य डॉ. नितेश बोरकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांवर प्रकाश टाकला असून त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या 'द प्राब्लम आफ रूपी' या ग्रंथाविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. राजेश गर्गम सर यांनी बाबासाहेबांच्या जिवनावर प्रकाश टाकला यावेळी मंचावर महाविद्यालयाचे कार्य प्राचार्य डॉ. नितेश बोरकर सर, प्राध्यापक अमित कोहपरे सर, प्राध्यापिका विशाखा पारखी मॅडम, तसेच प्राध्यापक बोदलकर मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा. से.यो. विभाग प्रमुख प्राध्यापिका बोदलकर मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून कार्यक्रम आयोजित करण्याचे उद्देश स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी परसा बी. ए. प्रथम वर्ष या विद्यार्थ्यांनीनी केले, तर आभार प्रदर्शन सह कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक खाडे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रा. कैलाश चापले सर, प्रा. अक्षय पाल सर, प्रा. डॉ. अविनाश रामटेके सर, प्रा. चेडे मॅडम, प्रा. रूकमोडे मॅडम, प्रा. नागापुरे मॅडम व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

