गडचिरोली शहरातील समस्या तातडीने सोडवा
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी
प्रतिनिधी,
गडचिरोलीः गडचिरोली शहरातील नागरिक बऱ्याच समस्यांना तोंड देत असून या समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे. आज बुधवार 16 जुलै रोजी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी काटकर यांची भेट घेवून या समस्यांचे निवेदन सादर केले.
गडचिरोली शहरातून सुरु असलेली जड वाहनांची वाहतूक शहराबाहेरुन रिंगरोड बनवुन करण्यात यावी व वारंवार होणारे अपघात टाळण्यात यावे. गडचिरोली शहरात बनवण्यात आलेली भुमिगत गटार योजना पुर्ण शहरात टाकण्यात येऊन ती त्वरीत कार्यन्वीत करण्यात यावी. ही योजना अजुन पर्यंत कार्यन्वीतकरण्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करुन त्यांचेकडून झालेल्या खर्च वसुल करण्यात यावा. गोकुल नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (आयटीआय) या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी पक्क्या नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे व या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे.
सायन्स कॉलेज ते चनकाई नगर आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटवून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. शहरातील बऱ्याच रस्त्यांचे सिमेंटीकरण केल्यानंतर नाल्यापर्यंतच्या उर्वरीत जागा मोकळ्या ठेवण्यात आल्याने रस्ते अरुंद झाले आहेत व नागरीकांना त्रास होत आहे. तरी अशा सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे. गडचिरोली शहरातील सर्व ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करुन तेथे नागरिकरांना बसण्यासाठी व मुलांना खेळण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच व्यायाम करण्याची उपकरणे लावण्यात यावी. गडचिरोली शहरातील मुख्य चौकात संविधान निर्मितीच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त संविधान प्रस्तावीका स्तंभ उभारण्यात यावा.
चामोर्शी रोड ते आय.टि.आय या जुन्या डि.पी मध्ये मंजुर असलेल्या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे. शहरातील मोकाट गुरे, डुकरे, कुत्रे आदी जनावरांचा ताबोडतोब बंदोबस्त करण्यात यावा. शहरातील सर्व ओपन स्पेस मध्ये सार्वजनिक वाचनालयांची सोय करण्यात यावी. चामोर्शी रोडवर नव्याने वसलेल्या शिवनगर व कैकाडी वस्ती येथे रस्ते, वीज, पिण्याचे पाणी इ. मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्या. शहरातील नाल्यांची सफाई नियमित पणे करण्यात यावी नालीतून काढलेला कचरा त्वरीत उचलण्यात यावा डास प्रतीबंधक फवारणी नियमित करण्यात यावी, इत्यादी मागण्यांचा निवेदन समावेश होता.
या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, विधानसभा अध्यक्ष प्रदीप भैसारे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, जगन जांभूळकर, प्रेमेंद्र सहारे, शहराध्यक्षा वनमाला झाडे, उपाध्यक्षा कविता रामटेके इत्यादी कार्यकर्त्ये उपस्थित होते