८ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोने चोरट्यांना पोलीसांनी केले जेरबंद
चिमुर (चंद्रपूर) :-
८ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोने चोरट्यांना चिमुर (चंद्रपूर) पोलीसांनी जेरबंद केले आहे
११ जुलै २०२५ रोजी कल्पना मुरलीधर गोनाळे वय 46 वर्षे रा.
प्रगतीनगर चिमूर यांनी चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.ज्यामध्ये ६ जुलै रोजी ते घराला कुलूप लावून गावी गेले होते आणि ११ जुलै रोजी परत आल्यावर घराचे कुलूप तुटलेले आढळले. घरातील कपाटात ठेवलेले ८ तोळे ६०० ग्रॅम वजनाचे सोने चपला कंठी, भांडे, चुडी, गोप, कानाचे टॉप, अंगठी आणि इतर अशा वस्तू चोरीला गेल्या होत्या ज्यांची किंमत ८ लाख ४९ हजार रुपये होती. तक्रारीवरून चिमूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) (४) अंतर्गत गुन्हा क्रमांक २५६/२०२५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस ठाण्याच्या जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने तंत्रज्ञानाचा वापर करून अज्ञात आरोपींचा शोध घेतला आणि आरोपी सचिन उर्फ बादशहानगरले रा. गौतमनगर भद्रावती, गोपाळ उर्फ बडा कोब्रा जीवन मालकर २५ रा. शामनगर चंद्रपूर यांना ताब्यात घेतले आणि चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून ३८ तोळे सोने जप्त केले आहे. चिमूर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि बलराम झाडोकर पोउपनी संतोष निंभोरकर, सर्वेष बेलसरे, पोउपनी सुनील गौरकर, सफळ निळवंडे, येलपुलवार, जयसिंग, गणेश मोहुर्ले, नितीन कुरेकर,नितीन साळवे, चेतन गेलवार, सचिन गुरुनुले, सुरेंद्र मंहतो, रजनीकांत पुठ्ठावार, सुभाष गौरकार, सतिश अवथरे, इमरान खान, दिपक डोंगरे, प्रमोद कोटनाके, बागेश्वर किशोर वैरागडे, मिलींद जांभुळे, पोअ अजित शेंडे, प्रसाद धुळगुंडे, प्रफुल गारघाटे, शशांक बदामवार, किशोर वकाटे, हिराला गुप्ता, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, अराडे, वृषभ बारशींगे, मिलींद टेकाम, अर्पना मानकर यांनी केली आहे