गुरु पौ्णिमेच्या निमित्ताने अमुगामी लोकराज्य महाभियान
प्रमोद झरकर उपसंपादक वैनगांगा वार्ता १९
चामोर्शी:-
(अनुलोम) याच्या मध्येमाने "गुरु गौरव " कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल कथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी येथे घेण्यात आला, कार्यक्रम अध्यक्ष श्रीमती मीना गद्देवार प्राचार्य जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी कार्यक्रमाचे उद्घाटक पुरुषोत्तम घ्यार मैत्री क्लीनिक समन्वयक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी , कार्यक्रमाला वक्ता म्हणून अविनाश तालापल्लीवार, अनुलोम भाग जनसेवक विनायक कुनघाडकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधीर गटपायले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व चंद्रशेखर मस्के शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. गुरु गौरव कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थिनी यांनी गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन गुरूंचे गौरव केले, तसेच पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यकर्माची प्रस्तावना विनायक कुनघाडकर यांनी अनुलोम संदर्भात आणि जनसामान्य पर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे काम अनुलोम संस्था करते हे सागितले उद्घाटक पुरुषोत्तम घ्यार सरांनी विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन करताना शिक्षकांचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांचा भावी आयुष्यात चांगले वर्तन कसे काय करणार ते सांगून मोबाईल चे दुरउपयोग सांगितले. प्रमुख वक्ते अविनाशजी तालापल्लीवार यांनी पुरातन काळातील गुरु आणि शिष्याचे नाते,संस्कृती याबद्दल विवेचन केले, अध्यक्षीय मार्गदर्शनात श्रीमती प्राचार्य मीना गद्देवार यांनी आजच्या घडीत गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते संबंध बाबत मार्गदर्शन केले, कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व 8 ते 12 चे सर्व विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केले.