भरधाव दुचाकीची दगडाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

0
 भरधाव दुचाकीची दगडाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू 

 कढोली नाल्या जवळील वळनावरील घटना 


आष्टी (अशोक खंडारे):-
 भरधाव दुचाकी अनियंत्रित होवुन दगडाला धडक दिली यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 एप्रिल सोमवारला दुपारी तीन वाजता च्या सुमारास अनखोडा - कढोली मार्गावरील नाल्या जवळील वळनावर घडली.

कार्तिक किशोर पाल वय 19 वर्ष रा कढोली तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे 

मृतक कार्तिक हा दुचाकीने आष्टीवरुन कढोली कडे जात होता.त्याच्या दुचाकीचा वेग भरपूर असल्याने कढोली जवळील नाल्या जवळील वळनावर अनियंत्रित झाली व दगडाला धडकली यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली व तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस घटनास्थळी पोहोचले. व पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !