महिला आरक्षण विधेयक हे भाजपाचे षडयंत्र , जिल्हा काँग्रेस गडचिरोली
गडचिरोली (अशोक खंडारे):-
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांकडून पसरवण्यात येत असलेल्या “फेक नरेटीव्ह”ला उत्तर देण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, राजेश ठाकुर, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, दिवाकर मिसार, हरबाजी मोरे, श्रीनिवास ताडपल्लीवार, रजनीकांत मोटघरे, गुरूदास ठाकरे, रूपेश टिकले, विजय लाड, कुणाल ताजणे, नादिम नाथानी, विनायक कुंदोजवार, निकेश कामीडकर, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पुष्पलता कुमरे, शालीनी पेंदाम, पोैर्णिमा भडके, मिनल चिमुरकर, शितल ठवरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांना संसद व विधानसभांमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे दाखवले असले तरी अंमलबजावणीसंदर्भात स्पष्टता नसल्यामुळे प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही.
महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आरक्षण अत्यावश्यक असून, त्याशिवाय राजकीय क्षेत्रात त्यांचे प्रतिनिधित्व वाढणे शक्य नाही, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच, “2023 मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हेच प्रत्यक्षात लागू करून त्याची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी,” अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. सरकारने या मुद्द्यावर राजकीय फायदा घेण्याऐवजी पारदर्शक व ठोस भूमिका घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले
.

