नवोदय प्रवेश परीक्षेत आष्टीच्या दोन मुलांचे यश ,मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या कडून सत्कार

0
नवोदय प्रवेश परीक्षेत आष्टीच्या दोन मुलांचे 
यश ,मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या कडून सत्कार.




आष्टी (अशोक खंडारे):-
 नुकत्याच पार पडलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत आष्टी येथील दोन विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे, आष्टी येथील लिटिल हार्ट इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शिकत असलेल्या मयंक संदीप वैरागडे याने ९२.७५ टक्के गुण संपादन करत जिल्ह्यात ५ वा क्रमांक तर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील श्रेयांश दिपक भिवनकर याने ९१.२५ टक्के गुण संपादन करीत जिल्ह्यात २५ वे  क्रमांक प्राप्त केले. त्याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे जिल्हा परिषद गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला व पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या. दोन्ही विद्यार्थ्यानी अतिशय जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करत यशाचे शिखर गाठले. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी आई, वडील व मार्गदर्शक प्रा. संघशील बावणे, प्रा. प्रशिक डोंगरे यांना दिले आहे यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !