वैनगंगा नदीच्या पुलावर पडलेल्या भगदाडामुळे दोन ट्रकची जबर धडक एक जण गंभीर जखमी

0
वैनगंगा नदीच्या पुलावर पडलेल्या भगदाडामुळे दोन ट्रकची जबर धडक एक जण गंभीर जखमी 

पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह , कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांना करा निलंबित 



आष्टी - (अशोक खंडारे):-
 आष्टी - चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या नवीन पुलावर मधोमध पडलेल्या भगदाडामुळे दोन आयशर ट्रकची एकमेकांना धडक बसली यात मागून येणाऱ्या ट्रकचा ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २५ एप्रिल शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.

निलेश कन्नाके वय 30 वर्ष रा. गडचांदुर असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे.

  सिमेंटची वाहतूक करणारी दोन आयशर ट्रक गडचांदुर वरून आष्टी कडे येत होते. वैनगंगा नदीच्या पुलावर भला मोठा खड्डा समोरील ट्रकचालकाला दिसताक्षणीच ब्रेक मारला त्यामुळे मागुन येणारा ट्रक क्रमांक 
MH 40 AK 2958 ने MH 18 BG 4149 ला जबर धडक दिली यात मागून येणाऱ्या ट्रक चा ट्रकचालक गंभीर जखमी झाला. रस्त्यावरील सुरक्षारक्षकांनी ट्रकचालकाला बाहेर काढत आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले 



राष्ट्रीय महामार्ग 353 बि या चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या नवीन पुलाचे काम दिड वर्षापूर्वी पूर्णत्वास आले. व या पुलावरून सहा महिन्यांपूर्वी वाहतूक सुरू करण्यात आली. या नवीन पुलाच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला आणि त्यामुळे अपघातही घडला. पुलाचे काम होवून केवळ दीड वर्षाचा कालावधी झाला अजुनही या पुलाचे उद्घाटन सुद्धा झालेले नाही आणि इतक्या कमी कालावधीत पुलावर खड्डा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला निलंबित करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !