राजूभाऊ पोटवार यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

0
राजूभाऊ पोटवार यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ उत्साहात संपन्न


आष्टी (अशोक खंडारे):-

आष्टी ता. चामोर्शी, जि. गडचिरोली : येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात दीर्घकाळ सेवा बजावणारे वरीष्ट लिपीत राजूभाऊ पोटवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी संचालित या संस्थेत तब्बल 35 वर्षे 10 महिने प्रामाणिक सेवा दिलेल्या पोटवार यांचा गौरव करण्यात आला.

समारंभाचे अध्यक्ष वन वैभव शिक्षण मंडळाचे सचिव बबलूभैया हकीम  तर प्रमुख उपस्थितीत शाहीनभाभी हकीम, अबूझमाळ शिक्षण संस्थेचे सचिव समशेर खान पठाण, लीना पठाण, लवली शेख, मकसूद शेख, जहीर हकीम, अस्मा भाभी हकीम, शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, प्राचार्य किशोर पाचभाई, माजी प्राचार्य शैलेंद्र खराती आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सत्कारमूर्ती राजूभाऊ पोटवार यांचे वडील गंगाधर पोटवार व आई शांता बाई गंगाधर पोटवार यांचीही विशेष उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजूभाऊ पोटवार यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि समर्पित सेवाभावाचे कौतुक केले. संस्थेच्या प्रगतीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सेवानिवृत्त राजूभाऊ पोटवार यांनी आपल्या मनोगतात सेवाकाळातील अनुभव सांगताना सहकारी, शिक्षकवर्ग व संस्थेचे आभार मानले. “संस्थेने दिलेल्या संधीमुळेच आजपर्यंत प्रामाणिकपणे सेवा करता आली,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास वन वैभव शिक्षण मंडळातील सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभात सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ गणेश खुणे तर आभार डॉ. मुसणे यांनी मानले
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !