विद्याभारती शाळांमधील नियुक्त्या अवैध, आजाद समाज पार्टीचा आरोप, कारवाईची मागणी

0
 विद्याभारती शाळांमधील नियुक्त्या  अवैध, आजाद समाज पार्टीचा आरोप, कारवाईची मागणी



गडचिरोली : शिक्षण विभागातील शालार्थ आय डी घोटाळा चर्चेत असताना गडचिरोली येथील दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थे अंतर्गत असलेल्या विद्याभारती कन्या हायस्कूल गडचिरोली येथील मुख्याध्यापिका वंदना राजू मुनघाटे यांची नियुक्ती व पदोन्नती अवैध आहे तसेच विद्याभारती हायस्कूल गोगाव येथील प्रतिभा नागोराव रामटेके यांची मुख्याध्यापिका म्हणून झालेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप करत तातडीने कारवाई करण्याची मागणी आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली.



प्रकरण 1
पक्षाचे अध्यक्ष राज बन्सोड यांनी दिलेल्या पत्रकानुसार विद्याभारती कन्या हायस्कूल येथे 2010 मध्ये केलेल्या सहाय्यक शिक्षिका पदभरती जाहिरातीनुसार ‘बीए बीएड’ अशी शैक्षणिक पात्रता पाहिजे असताना माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीनुसार वंदना राजू मुनघाटे यांची शैक्षणिक पात्रता ‘बी कॉम बीएड’ अशी आहे. हायस्कूल ला एक ही विषय बी कॉम संबंधित नसतो. तरीही त्यांची निवड करण्यात आली. तसेच जाहिरात एसटी उमेदवारसाठी आरक्षित असताना व उमेदवार उपलब्ध असताना वंदना मुनघाटे ओबीसी प्रवर्गातील असून रोष्टर ला डावलून नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती करताना शिक्षण विभागातील अनेक अधिकारी व संस्थाध्यक्ष यांनी अनेक कागद पत्राची अफरातफर करून मोघम व नियमबाह्य संमती पत्रे तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली. 
प्रकरण 2
विद्याभारती हायस्कूल गोगाव येथील कु. प्रतिभा नागोराव रामटेके यांची सेवाज्येष्ठतेचा नियम डावलून मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने त्याबाबत श्री. रमेश रामटेके यांच्या तक्रारीवरून मा. शिक्षणाधिकारी माध्य. यांनी सुनावणी घेऊन प्रतिभा रामटेके यांची पदोन्नती अवैध असल्याने रद्द करण्यात यावी असे आदेश दिले असताना अजूनही संस्थेने कोणतीही कारवाई केली नाही. याविरोधात संस्थेने नागपूर खंडपिठात याचिका दाखल केलेली होती परंतु 18 डिसेंबर 2024 ला ती याचिका नागपूर खंपिठाणे खारीज केली. 
शिक्षण उपसंचालक यांचे आदेशाची अवहेलना  आदेश असताना कारवाई नाही
 वंदना मुनघाटे व प्रतिभा रामटेके यांच्या दोन्ही नियुक्त्या अवैध असल्याच्या तक्रारीवरून चौकशी अंती शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी श्रीमती वंदना राजू मुनघाटे व कु. प्रतिभा नागोराव रामटेके यांचे पद रद्द करण्याचे दि. 7 डिसेंबर 2023 चे तसेच दि.19 ऑगस्ट 2024 चे दोन स्पष्ट आदेश पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी गडचिरोली यांना प्राप्त झाले असताना अद्याप दोन्ही कर्मचारी पदावर कायम आहेत. 
शिक्षणाधिकारी व संस्था दोघांनी त्यांची पाठराखण करत शासकीय आदेश व उच्च न्यायालय, नागपूर खंड पिठाच्या आदेशाची अवहेलना केल्याचे यावरून दिसते आहे  सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन तातडीने संबंधित अधिकारी व मुख्याध्यापिका वंदना मुनघाटे तथा प्रतिभा रामटेके यांच्यावर कठोर कारवाई करावी.असे निवेदन शिक्षणाधिकारी माध्य. यांना आजाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आले.
  निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी हंसराज उराडे, महासचिव पुरुषोत्तम रामटेके, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, विधानसभा प्रभारी धनराज दामले, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !