बल्लारपूर : -
विसापुर टोलनाका येथे पथकर वाचविण्याच्या प्रयत्नातून पथ नाका कर्मचाऱ्याच्या अंगावरून वाहन चालविले असून पथकर कर्मचारी गंभीर जखमी झाला. संजय अरुण वांढरे वय २७ वर्षे रा. गांधी वार्ड बल्लारपूर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
आज रात्री १२.४० वाजता
बल्लारपूर वरून चंद्रपूर कडे माल घेऊन जाणारी टाटा एस क्रं. एमएच ३४ बीझेड ८८६९ वाहन चालक टोलनाका वाचविण्याकरीता टोल फ्री लेन वरून जात होता. त्याला तेथील कर्मचारी संजय अरुण वांढरे (२८) रा. गांधी वॉर्ड बल्लारपूर याने थांबविण्याचा प्रयत्न केला तसेच तेथील उपस्थित कर्मचारी सुद्धा वाहन थांबविण्याचा प्रयत्न करीत होते परंतु टाटा एसच्या वाहन चालकाने त्यांच्या अंगावरूनच वाहन नेले. त्यात संजय वांढरे हा जखमी झाला असून त्याचे बरगडीचे हाडे तुटले आहे. त्याच्यावर चंद्रपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून चालक फरार झाला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत