प्राणहीता नदीपात्रात एका इसमाचा बुडून मृत्यू

0
 प्राणहीता नदीपात्रात एका इसमाचा बुडून मृत्यू




गडचिरोली: गावालगत वाहत असलेल्या प्राणहीता नदीपात्रात नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गेलेल्या ७० वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना ८ जून रोजी घडली. मोंडी लचमा देवरवार वय ७० वर्षे रा. रामपूर, पोस्ट-बोरी, तालुका अहेरी जि-गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
अहेरी तालुका मुख्यालया पासून जवळून प्राणहिता नदी वाहते. अहेरी तालुक्यातील बोरी परिसरात बरेच भोई बांधव याच नदीपात्रात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ८ जून रोजी रामपूर येथील मोंडी लचमा देवरवार हे नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास बोरी स्मशानभूमी जवळील प्राणहिता नदी घाटावर मासेमारीसाठी गेला मात्र बराच वेळ मोंडी देवरवार घरी न परतल्याने सायंकाळी मुलगा शंकर मोंडी देवरवार आपल्या भावासह गावातील काही लोकांना सोबत घेऊन नदी पात्रात पाहिले असता वडील मोंडी देवरवार हे नदी पात्राच्या पाण्यात तरंगत असल्याचे आढळले.

सदर घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांना मिळाली. त्यांनी लगेच अहेरी पोलिसांना घटनेची माहिती देताच अहेरी पोलीस घटनास्थळी घाव घेत गावकऱ्यांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढूनमोका पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी येथे पाठवले. रात्रो उशीर झाल्याने सोमवारी ९ जून रोजी शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेमुळे देवरवार कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून अख्या रामपूर चेक गावात शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !