आष्टीत छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनी अभिवादन; शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

0
आष्टीत छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनी अभिवादन; शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती 


आष्टी, दि. १८ मार्च २०२६ (बुधवार) – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यासह स्थानिक नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देत त्यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी “छत्रपती संभाजी महाराज अमर राहो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी आशिष क्षिरसागर, दामोधर बाबनवाडे सर, संतोष बारापात्रे, संतोष नागरगोजे सर, छोटू दुर्गे, विष्णू नामेवार, बंडु मेदाडे, विनीत कलाक्षपवार, गणेश चौधरी, श्याम अमृतवार, अमित कुकुडकर, देविदास ठाकूर, सागर निखाडे, शुभम औतकार, गोलू कोसरे, प्रवीण तिवाडे , चिन्मय तुंडुलवार, महेश येलमुले, राजु करमनकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनीही स्वराज्याच्या इतिहासाचे स्मरण करून अभिमान व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !