आष्टी परिसरात गॅस सिलेंडर बुकिंग ठप्प; पेटवावी लागेल महिलांना पुन्हा मातीची चुल

0
आष्टी परिसरात गॅस सिलेंडर बुकिंग ठप्प;  पेटवावी लागेल महिलांना पुन्हा मातीची चुल 


राॅकेल व जलाऊ लाकूड टंचाईमुळे नागरिक हैराण; “लाडक्या बहिणींच्या नशिबी पुन्हा जुने दिवस?” करावे लागेल धुराचा सामणा 

आष्टी (प्रतिनिधी) :
आष्टी परिसरात मागील काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे गॅस उपलब्ध नाही, तर दुसरीकडे राॅकेल व जलाऊ लाकडाचीही टंचाई निर्माण झाल्याने विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
केंद्र सरकारने पूर्वी स्वस्त दरात गॅस उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी चुलीऐवजी गॅसचा वापर सुरू केला होता. मात्र सध्या बुकिंग प्रणालीत अडथळे येत असल्याने नागरिकांना पुन्हा जुन्या पद्धतीकडे वळावे लागत आहे. “शंभर रुपयांत गॅस मिळाला, पण आता बुकिंगच होत नाही, तर उपयोग काय?” असा सवाल स्थानिक महिलांकडून उपस्थित केला जात आहे. सह पालकमंत्री सांगतात की कमतरता न मग बुकिंग का होत नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे 
दरम्यान, राॅकेल उपलब्ध नसल्याने आणि बाजारात जलाऊ लाकूडही सहज मिळत नसल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. काही ठिकाणी लाकडाचे दर वाढल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. जंगलात सरपण आणन्यासाठी गेले तर वन विभाग अरथळा निर्माण करतो मग स्वयंपाक करणे हेच कुटुंबांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सी व प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन बुकिंग प्रक्रिया सुरळीत करावी, तसेच पर्यायी इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा “लाडक्या बहिणींच्या नशिबी पुन्हा चुलीवरील जुने दिवस येणार का?”  धुराचा सामणा करावा लागणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !