चारचाकी व दुचाकीच्या भिषण अपघातात दोन इसम जागीच ठार ,गडचिरोली तालुक्यातील घटना

0
चारचाकी व दुचाकीच्या भिषण अपघातात दोन इसम जागीच ठार ,गडचिरोली तालुक्यातील घटना 




गडचिरोली :-
 सावेला ते मारोडा रस्त्यावर चारचाकी वाहणाची दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दोघे इसम जागीच ठार झाले.
 दि. ९ जुन दुपारी ४.३० चे दरम्यान गडचिरोली वरून पोटेगांव कडे जाणारी चारचाकी वाहन नंबर MH 33 T 3693 तर पोटेगांव वरून गडचिरोली कडे जाणारी दुचाकी नंबर MH 33 AH 3050 मारोडा वरून दोन कि.मी अंतरावर जंगलरोडवर चारचाकीने जोरदार धडक दिल्यामुळे या भिषण अपघातात अनुराग रैजी मळवी वय २८ राहणार कसनसुर व दिवाकर विठ्ठल उसेंडी वय 32 वर्ष राहणार फुलबोडी दोघेही जागीच ठार झाले.या भिषण अपघातात दुचाकी मृत्युकांच्या अंगावर पडली होती. मारोडा व सावेला येथील पोलीस पाटिल सिमा मेश्राम हिने पोलीस स्टेशन पोटेगांव येथे माहिती देताच कर्तव्यदक्ष पोटेगांव पोलीस घटनास्थळी हजर झाले. रुग्णवाहिका बोलविण्यात आली तोपर्यंत दोघांचाही मृत्यु झाला होता. बघ्यांची गर्दी जमली होती. पोलीस पाटिल सिमा मेश्राम सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर मुजुमकर पोटेगांव व सुरेश उसेंडी यांनी सहकार्य केले. मृत्युदेह सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे शवच्छेदेनासाठी नेण्यात आले. पोटेगांव पोलीसांनी मर्ग दाखल करून अधिक तपास सुरु आहे. यात मात्र चारचाकी वाहणास पसार न होऊ देता लोकांनी त्याला अडवून धरले पोटेगांव पोलीसा कडून अधिक तपास सुरु आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !