केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रजत वाकळे यांचा फुलझेले दाम्पत्यांनी केला सत्कार.
गडचिरोली (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असलेले रजत सुनील वाळके हे केंद्रीय लोकसेवा आयोगची अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा ५१४ रॉंक मिळवून उत्तीर्ण झाले व गडचिरोली जिल्ह्यात मानाचे स्थान प्राप्त केले आहे
त्यामुळे16 मार्च ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजीत पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. संघरक्षित रामदास फुलझेले व त्यांच्या पत्नी सौ. अनुपमा संघरक्षित फुलझेले गडचिरोली यांनी मा. रजत सुनिल वाकळे यांचे घरी जाऊन, त्यांनी केंद्रिय लोकसेवा आयोगाची परीक्षा युपिएसी अत्यंत प्रतिष्ठेची परिक्षा देशात 514 रॉंक मिळवुन यश संपादन केले व गडचिरोली जिल्ह्याची मान उंचावली आहे. त्यांच्या यशाबद्दल इतरही विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. या यशाबद्दल मा. रजत सुनिल वाकळे यांचे शाल श्रीफळ व गुलदस्ता देवुन सत्कार केला आणि पुढील भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते

