पत्नीच्या त्रासाला कंटाळून 38 वर्षीय पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0
पत्नीच्या त्रासाला कंटाळून 38 वर्षीय पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

 आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत पत्नी व सासरचा उल्लेख
‘आई-वडिलांचा दोष नाही’ – चिठ्ठीत नमूद करत आत्महत्या


गडचिरोली, दि. 20 (प्रतिनिधी) :
तालुक्यातील पोर्ला येथील तुलतुली प्रकल्प कॉलनी परिसरात एका 38 वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुंडलिक रमेश डहलकर (वय 38) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8 ते 8.30 वाजताच्या दरम्यान पुंडलिक हे नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले. मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, त्यांच्या खोलीत मोबाईलजवळ एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी पत्नी सोनाली डहलकर व तिच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच आई-वडिलांचा कोणताही दोष नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
यानंतर शोध घेत असताना पोर्ला येथील तुलतुली प्रकल्प कॉलनीतील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. विहिरीतील पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी रमेश लहाणुजी डहलकर (वय 62) यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !