दोन दुचाकींची एकमेकांना धडक दोन्ही दुचाकीस्वार जखमी
आष्टी:-(अशोक खंडारे)
आष्टी मच्छी मार्केट पुढे दोन दुचाकींच्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आज दि. ४ जानेवारी ला सायंकाळचे ७ वाजताचे दरम्यान घडली
जखमी रमेश कलकोटवार वय ६० रा. आष्टी हे एम एच ३३ एफ ७९२४ आपल्या स्टुटीने मच्छी मार्केट कडून रोड क्रास करुन जात असताना चंद्रपूर रोडकडून येत असलेला रोहीत रमेश नल्लुरवार वय २३ रा .घोट हा दुचाकी क्र एम एच ३४ बि एक्स ११६० ने जब्बर धडक दिली त्या धडकेत दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले वाहतूक पोलिस प्रताप तोगरवार यांनी दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचारानंतर रमेश कलकोटवार यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले तर रोहीतवर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधीक तपास आष्टी पोलीस करीत आहेत

