आष्टी परिसरात अवैध दारूचा धंदा जोमात तंटामुक्त गाव समती कोमात मात्र वरदस्त कुणाचा?
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर ,ठाकरी,कुनघाडा,चंदनखेडी (वनग्राम), चौडमपल्ली, अनखोडा, आष्टी परिसरात अवैध गावठी दारू व देशी विदेशी दारू उघडपणे सुरू असून, या दारूचा पुरवठा तालुक्यातील विविध गावांत मोठ्या प्रमाणात कुठून होत आहे ? आष्टी परिसरात अवैध देशी विदेशी दारू येतेय कुठून? आणि या परिसरात खुलेआम विक्री केली जाते याला आशिर्वाद कुणाचा? असा सवाल आष्टी परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे. दारूचे व्यसन वाढून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अवैध धंद्यामुळे शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी आष्टी परिसरातील नागरिकांत चर्चा आहे. आष्टी परिसरातील अवैध देशी दारू बंद करण्याकरिता तंटामुक्त गाव समिती, पोलिस पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या गावात महीलांनी दारु बंदी घातली होती त्याच गावातील पाच पोलीस आष्टी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत तरीसुद्धा ईल्लूर गावात खुलेआम विक्री सुरू आहे म्हणून की काय ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे की वरदस्त कुणाचा? तंटामुक्त गाव समती ही निष्क्रिय झाली की काय अशी चर्चा सुरू आहे पोलीस पाटील सुद्धा समीतीचे निमंत्रक आहेत ते पण या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे
तात्काळ आष्टी व परिसरातील गावांमध्ये सुरू असलेली अवैध देशी दारू सट्टा (मटका) बंद करण्यात आला पाहीजेत जेणेकरुन गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या लोकांना सुखाने संसार करता येईल अशी कुजबूज लोकांमध्ये सुरू आहे

